प्रदूषण मंडळाची दत्त इंडियाला समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:30+5:302021-01-10T04:19:30+5:30
वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनी चालवत आहे. राख आणि पाणी प्रदूषण रोखणारी यंत्रणा कारखान्यात बसविली आहे, पण त्याचा वापर ...
वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनी चालवत आहे. राख आणि पाणी प्रदूषण रोखणारी यंत्रणा कारखान्यात बसविली आहे, पण त्याचा वापर पूर्ण क्षमतने केला जात नसल्यामुळे वसंतदादा कारखाना परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, याबाबतची तक्रार सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन उपप्रादेशिक अधिकारी अवताडे यांनी दत्त इंडिया कंपनीच्या प्रशासनास राख व पाणी प्रदूषणाबाबत समज काढली आहे. त्यात म्हटले की, राख नियंत्रण यंत्रणा बंद ठेवल्याने सांगली शहर व परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. बसविण्यात आलेली प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कायमस्वरुपी कार्यान्वित ठेवून पूर्ण क्षमतेने वापरण्यात यावी, अन्यथा आपल्या उदयोगांविरुध्द जल ( प्रदूषण, प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९७४ आणि हवा ( प्रदूषण, प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९८१ चे अनुक्रमे ३३-अ, व ३१-अ, अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी समज प्रदूषण विभागाने दत्त इंडिया कंपनीला दिली आहे.