अंकलखोप येथे आजपासुन दत्त जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:11+5:302020-12-29T04:26:11+5:30
अंकलखोप : अंकलखोप - औदुंबर (ता. पलुस ) येथील श्री दत्तगुरू जयंती उत्सव मंगळवार, दिनांक २९ डिसेंबरपासून सुरू ...
अंकलखोप : अंकलखोप - औदुंबर (ता. पलुस ) येथील श्री दत्तगुरू जयंती उत्सव मंगळवार, दिनांक २९ डिसेंबरपासून सुरू होत आहे. याकाळातील यात्रोत्सव प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार, मंगळवार व बुुधवार असे तीन दिवस औदुंबर तीर्थक्षेत्रापासून ४ किलोमीटरपर्यंत संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहे. त्यामुळे केवळ यात्रा उत्सव बंद आहे. मात्र, मंदिरातील नित्य धार्मिक कार्यक्रम ठरविल्याप्रमाणे होणार आहेत.
श्री दत्त जयंती उत्सवाचा मंगळवार हा मुख्य दिवस असून, मंगळवारी व बुधवारी पहाटे काकड व मंगल आरती, अभिषेक, महापूजा, नैवद्य व महाआरती, श्री दत्तगुरूंचा जन्मकाळ सोहळा सुरू होईल. धुपारती, पालखी, मंत्रपुष्पांजली, करूणा त्रिपादी होईल. मंगळवारी दुपारी ४ वाजता श्री दत्तगुरूंच्या जन्मावरील वासुदेव जोशी यांचे कीर्तन होईल.
गुरूवारी पहाटे ५ वाजता वासुदेव जोशी, नितीन गुरव, संतोष जोशी यांचे लळिताचे कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता काकड आरती, महापूजा, मंगल आरतीनंतर श्री दत्त जन्मोत्सवाची समाप्ती होईल. भाविकांसाठी घरीच ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे.