दत्तात्रय शिंदे सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक

By Admin | Published: June 9, 2016 04:30 PM2016-06-09T16:30:41+5:302016-06-09T16:30:41+5:30

सांगलीचे पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांची सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक म्हणून बुधवारी बदली करण्यात आली. त्यांच्याजागी सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय तुळशीदास शिंदे

Dattatray Shinde Sangli's new Superintendent of Police | दत्तात्रय शिंदे सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक

दत्तात्रय शिंदे सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. ९ -  सांगलीचे पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांची सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक म्हणून बुधवारी बदली करण्यात आली. त्यांच्याजागी सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय तुळशीदास शिंदे यांनी नेमणूक करण्यात आली आहे. सांगलीत जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळालेल्या फुलारी यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबविल्या होत्या.
सुनील फुलारी यांनी २० मे २०१५ रोजी सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार हाती घेतला होता. त्यांच्या एक वर्षाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली. पदभार हाती घेताच त्यांनी मिरजेचा गणेशोत्सव व ऊसदर आंदोलन कौशल्याने हाताळले. त्यामुळे गेल्या गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. ऊसदर आंदोलनावेळी दरवर्षी असणारी तणावाची स्थिती फुलारी यांच्या काळात कमी प्रमाणात जाणवली. इस्लामपूरसह तीन ते चार ठिकाणी दुहेरी खुनाच्या घटनाही या काळात घडल्या. या खुनांचा छडा लावण्यातही फुलारी यांना यश आले. पोलिसांच्या बदल्यांच्या गॅझेटबाबत दरवर्षी वादविवाद होत. यंदा मात्र फुलारी यांनी पारदर्शीपणे बदल्यांचे गॅझेट फोडल्याने कोणताही वाद झाला नाही. केवळ एका वर्षातच त्यांची सिंधुदुर्गच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
फुलारी यांच्याजागी सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिंदे यांनी सिंधुदुर्गमध्ये आदर्शवत कामगिरी केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पदाच्या काळात त्यांनी गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी विशेष मोहीम सुरू केली. गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन, महिलांच्या सुरक्षिततेसाठी एफआयआर अ‍ॅप, प्रतिसाद अ‍ॅप व दामिनी पथक तैनात करणे याला त्यांनी प्राधान्य दिले. तक्रारींचे निवारण तात्काळ करता यावे यासाठी त्यांनी सोशल मीडिया विशेषत: व्हॉटस् अ‍ॅपच्या वापरावर भर दिला. त्यांनी यापूर्वी गडचिरोली, गोंदिया, सोलापूर, नवी मुंबई, मुंबई येथे विविध पदांवर काम केले आहे. येत्या तीन ते चार दिवसात ते पदभार स्वीकारतील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले. त्याला जनतेनेही चांगली साथ दिली. आपले काम सांगलीकरांना ज्ञात आहे. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यात वर्षभराच्या काळात यश आले. आपल्या कारकीर्दीत जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्हा शांत ठेवण्यात यशस्वी ठरलो.
- सुनील फुलारी, मावळते पोलिस अधीक्षक

शहरच्या उपअधीक्षकपदी बच्छावे
सांगली शहरच्या पोलिस उपअधीक्षकपदी सुहास बच्छावे यांची नेमणूक करण्यात आली आहे. बच्छावे सध्या पालघर जिल्ह्यात मीरा रोड ठाण्याकडे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. शहरच्या पोलिस उपअधीक्षकपदाचा प्रभारी पदभार धीरज पाटील यांच्याकडे आहे. प्रकाश गायकवाड यांच्या बदलीनंतर चार महिन्याने शहरला पोलिस उपअधीक्षक मिळाला आहे.

नवे पोलिस अधीक्षक
नवे पोलिस अधीक्षक दत्तात्रय गायकवाड मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत. एम. एस्सी., जी. डी. सी. अ‍ॅन्ड ए. डी. सी. ए., एल. एल. बी. आदी शैक्षणिक पदव्या प्राप्त केलेल्या शिंदे यांनी १९९६ मध्ये परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक या पदावर कारकीर्दीस सुरुवात केली. विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक, विशेष सेवा पदकांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. यंदाच्या जानेवारीमध्ये त्यांची भारतीय पोलिस सेवेमध्ये (आयपीएस) पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.

Web Title: Dattatray Shinde Sangli's new Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.