पूरग्रस्तांसाठी धावली पतंगरावांची कन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:08 AM2019-08-22T00:08:50+5:302019-08-22T00:08:53+5:30

भिलवडी : पलूस तालुक्यात आलेल्या महापुरानंतर नदीकाठची गावे हळूहळू सावरू लागली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता डॉ. पतंगराव कदम यांची ...

Daughters of Moths run for flood victims | पूरग्रस्तांसाठी धावली पतंगरावांची कन्या

पूरग्रस्तांसाठी धावली पतंगरावांची कन्या

Next

भिलवडी : पलूस तालुक्यात आलेल्या महापुरानंतर नदीकाठची गावे हळूहळू सावरू लागली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता डॉ. पतंगराव कदम यांची कन्या डॉ. अस्मिता जगताप व त्यांचे पती राजेंद्र जगताप व दीर पुणे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप हेही धावून आले आहेत. त्यांनी सोपानकाका सहकारी बँक लि., सासवड व अन्य संस्थांच्यावतीने संतगाव हे गाव दत्तक घेतले. डॉ. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारती हॉस्पिटलची २० पथके पूरग्रस्त भागात वैद्यकीय सेवा देत आहेत.
जगताप यांच्या विविध संस्थांमार्फत संतगाव येथील पडझड झालेल्या घरांची पुनर्बांधणी, गावातील रस्त्यांची दुरूस्ती, शौचालयांची व्यवस्था, शाळांची उभारणी, जनावरांचे गोठे, रुग्णालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात संत सोपानकाका बँक, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, पुरंदर मिल्क, पुरंदर अ‍ॅग्रो प्रा. कंपनी असे इतर, यांच्यासह अनेक सहकारी संस्थांचे सभासद, सहकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर केला आहे. पतंगराव कदम यांनी मोठ्या कष्टाने हा परिसर जपला. आज त्यांची मुले व स्नुषाही त्याच तडफेने या परिसराच्या कठीण प्रसंगात धावून आले आहेत.
पुराच्या पहिल्या दिवसापासून आ. डॉ. विश्वजित कदम यांनी मदतकार्यात सहभागी होऊन पूरग्रस्तांना आधार दिला. आता पूर ओसल्यानंतर डॉ. अस्मिता जगताप यांनी स्वत: ठिकठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवत लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली. डॉ. अस्मिता यांनी सासरच्या संस्थांमार्फत याठिकाणी पुनर्वसनाची जबाबदारी देखील स्वीकारली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माहेरवाशीण धावून आल्याची भावना व्यक्त होत आहे.

Web Title: Daughters of Moths run for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.