अटीतीच्या लढतीत दयाळ ठरला सांगलीचा शहर पक्षी, मिळविली ५६१ मते

By संतोष भिसे | Published: September 24, 2023 08:00 PM2023-09-24T20:00:49+5:302023-09-24T20:01:14+5:30

शहर पक्षी म्हणून बहुमान मिळविला.

dayal became sangli city bird and win securing 561 votes | अटीतीच्या लढतीत दयाळ ठरला सांगलीचा शहर पक्षी, मिळविली ५६१ मते

अटीतीच्या लढतीत दयाळ ठरला सांगलीचा शहर पक्षी, मिळविली ५६१ मते

googlenewsNext

संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या शहर पक्षी निवडणुकीची मतमोजणी रविवारी (दि. २४) झाली. त्यामध्ये दयाळ पक्षाने अवघ्या चार मतांनी बाजी मारली. शहर पक्षी म्हणून बहुमान मिळविला.

दयाळला ५६१ तर दुसऱ्या क्रमांकावरील तांबटला ५५७ मते मिळाली. बांगलादेशचा राष्ट्रीय पक्षी असणारा दयाळ आता सांगलीचा शहर पक्षी म्हणून मिरविणार आहे. गेल्या चार रविवारी महापालिका क्षेत्रात विविध १० ठिकाणी मतदान प्रक्रिया चालली. शहरातील नियमित वास्तव्य, मोठ्या संख्येने वावर यासह विविध निकषांवर पक्षीप्रेमींनी मतदान केले. आमराई, शामरावनगर, शांतिनिकेतन परिसर, कृष्णाकाठ आदी ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान सुरु होत होते. आज शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले. दुपारी मतमोजणी झाली. त्यामध्ये दयाळने गुलाल उधळल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी जल्लोष केला. मतमोजणी निरीक्षक म्हणून महापालिकेचे सहायक सहदेव कावडे यांनी काम पाहिले. मतमोजणी निरीक्षक म्हणून महापालिकेचे सहायक सहदेव कावडे यांनी काम पाहिले. 

संयोजन विजय सावदी, डॉ. संतोष आफळे, मंजुषा पाटील, सचिन शिंगारे, डॉ. वैजयंती आफळे, समीर म्हेत्रास, अजितकुमार पाटील, फिरोज तांबोळी, संजय अष्टेकर, अंशुमन नामजोशी, डॉ. गीतांजली गुप्ते व बर्डसाॅंगच्या सदस्यांनी केले.

दहा वर्षांचे नेतेगिरी

दयाळ पक्षी आगामी १० वर्षे सांगलीचा शहर पक्षी म्हणून मिरविणार आहे. त्यानंतर पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवून नवा नेता निवडला जाईल. निवडणूक न झाल्यास नव्या निवडणुकीपर्यंत दयाळ हाच शहर पक्षी म्हणून कायम असेल. निवडणुकीचे संयोजन शरद आपटे, डॉ. नयना पाटील, श्रीकृष्ण कोरे,विश्वनाथ माडोळी आदींनी केले.

सांगलीत २२० प्रजातींचे पक्षी

इ -बर्ड संकेतस्थळावरील नोंदीनुसार सांगली परिसरात तब्बर २२० प्रजातींचे पक्षी आढळतात. त्यांचा वर्षभर परिसरात वावर असतो. नदीकाठ, शहरभरातील पाणस्थळे आणि लगतची समृद्ध शेती यामुळे पक्ष्यांचा वावर वाढला आहे.

असे निवडले उमेदवार

उमेदवार निवड प्रक्रियेत ३५ पक्षीनिरीक्षक सहभागी झाले. त्यांनी १२ प्रजातींची नावे सुचविली. पैकी सर्वात जास्त पसंती मिळालेल्या पाच पक्ष्यांची  उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : दयाळ (५६१), तांबट (५५७), शिक्रा (३७८), भारतीय राखी धनेश (३५६), हळदी- कुंकू बदक (२७५).

Web Title: dayal became sangli city bird and win securing 561 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली