Sangli: आटपाडीत बंद चारचाकी गाडीत आढळला मृतदेह, पोलिस तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 12:38 PM2024-06-06T12:38:31+5:302024-06-06T12:39:15+5:30

मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून, मृत्यू नेमका कशाने झाला? याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

Dead body found in locked four-wheeler in Atpadi Sangli, police investigation underway | Sangli: आटपाडीत बंद चारचाकी गाडीत आढळला मृतदेह, पोलिस तपास सुरु

Sangli: आटपाडीत बंद चारचाकी गाडीत आढळला मृतदेह, पोलिस तपास सुरु

आटपाडी : आटपाडी शहरातील संत सावता माळी महाराज मठामागे बंद असणाऱ्या चारचाकी वाहनामध्ये बुधवारी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी शहरातील संत सावता माळी महाराज मठाच्या पाठीमागे गेल्या एक वर्षापासून बंद आलेली चारचाकी गाडी नंबर एमएच ९ बीएम ७३६३ उभी आहे. याठिकाणी लहान मुले खेळत असताना गाडीमधून वास येत असल्याची माहिती मुलांनी अमित फडतरे यांना दिली.

यावेळी अमित फडतरे यांनी गाडीचे दरवाजे उघडून पाहिले असता आतमध्ये अंदाजे ३५ ते ते ४० वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, मृतदेहाचा असा उग्र वास येत असल्याने जवळ कोणीच जाण्याचे धाडस करत नव्हते. हा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. या घटनेची माहिती त्यांनी आटपाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून, मृत्यू नेमका कशाने झाला? याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Dead body found in locked four-wheeler in Atpadi Sangli, police investigation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.