पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

By Admin | Published: March 21, 2017 08:18 PM2017-03-21T20:18:40+5:302017-03-21T20:18:40+5:30

कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली (टी) येथे चार वर्षाच्या बालकाचा पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला

The death of the child in the beating of a scattered dog | पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि.21  - कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली (टी) येथे चार वर्षाच्या बालकाचा पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना आजसकाळी साडेसात वाजता घडली. बाबासाहेब राजाराम जगताप असे या बालकाचे नाव असून,या घटनेने करोली परिसरात खळबळ माजली आहे.
करोली (टी) येथील जगताप वस्तीवर राजाराम पाटील यांचे कुटुंब राहते. मंगळवारी सकाळी घरातील सगळी माणसे शेतातील ज्वारी काढायला गेली होती. त्यावेळी राजाराम पाटील यांचा चार वर्षांचा मुलगा बाबसाहेब घरी झोपला होता. घराचे दार बंद केले होते, परंतु कडी लावली नव्हती. साडेसात वाजण्याच्या सुमारास एक पिसाळलेले कुत्रे पाटील यांच्या घरात शिरले आणि त्याने झोपलेल्या बाबासाहेबवर प्राणघातक हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या मानेला धरून त्याला फरफटत बाहेर आणले व हल्ला करीत घराच्या मागे नेले.
तेथे त्याच्या डोक्यावर, मानेवर, नरड्याला जोरदार चावा घेतला. हे त्याच्या आईने पाहताच पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडातून मुलाला सोडवून घेतले. त्याच्या आईच्या हातालाही कुत्र्याने गंभीर चावा घेतला. गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेबला कवठेमहांकाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी वस्तीवर पसरली. चिडलेल्या जमावाने कुत्र्याला ठार मारले. कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त
होत आहे.
मुलीनंतर बारा वर्षांनी झालेल्या मुलाच्या मृत्यूने शोक अनावर राजाराम पाटील निवृत्त सैनिक आहेत. त्यांना १६ वर्षाची मुलगी असून तिच्या जन्मानंतर १२ वर्षांनी बाबासाहेब याचा जन्म झाला होता. त्याला काळाने असा हिरावून घेतल्याने बाबासाहेबच्या आई, वडिलांचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता.

Web Title: The death of the child in the beating of a scattered dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.