डोक्यात गोळी झाडून घेतलेल्या कापूसखेडच्या वकिलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:18 PM2017-10-28T13:18:35+5:302017-10-28T13:23:25+5:30
गावठी पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून घेतलेल्या कापूसखेड (ता. वाळवा) येथील संग्राम धोंडिराम पाटील (वय ३३) या वकिलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. गेल्या चार दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
सांगली , दि. २८ : गावठी पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून घेतलेल्या कापूसखेड (ता. वाळवा) येथील संग्राम धोंडिराम पाटील (वय ३३) या वकिलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. गेल्या चार दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
इस्लामपुरातील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावर संग्राम पाटील व त्यांचे मित्र संदीप पाटील यांचे संयुक्त कार्यालय आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता संग्राम पाटील यांनी गावठी पिस्तूलमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली होती. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
गोळी झाडून घेण्यापूर्वी त्यांनी डायरीच्या पहिल्या पानावर ह्यसॉरीह्ण असा शब्द इंग्रजीत लिहला होता. घटना घडल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांना त्यांचा जबाबही नोंदवून घेता आला नाही.
शनिवारी सकाळी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच इस्लामपूर, कापूसखेड परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट न झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.