Sangli: मारहाणीतील जखमी युवकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल; संशयित आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 03:37 PM2024-05-31T15:37:08+5:302024-05-31T15:42:07+5:30

संशयित आरोपीची न्यायालयातून जामिनावर मुक्तता करण्यात आली होती

Death of injured youth in beating, murder case registered; Suspect arrested in Sangli | Sangli: मारहाणीतील जखमी युवकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल; संशयित आरोपीस अटक

मृत-अमृत देसाई

विकास शहा

शिराळा: चिखली (ता.शिराळा) येथे जुन्या पैशाच्या देणे घेणेच्या कारणावरुन झालेल्या मारहाणीत जखमी अमृत दत्तात्रय देसाई (रा. भाटशिरगाव) यांचा उपचारादरम्यान कराड येथील रुग्णालयात बुधवारी (दि.२९) मृत्यू झाला आहे. सदर घटना ६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याबाबत संशयित आरोपी सुहास नामदेव गायकवाड (रा.चिखली) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सुनिल बाबासाहेब देसाई व त्याचा चुलत भाऊ अमृत दत्तात्रय देसाई हे संशयित आरोपी सुहास नामदेव गायकवाड यांचे घरी जेवायला गेले होते. यावेळी जुन्या पैशाच्या देणे घेणेच्या कारणावरुन वाद झाला. संशयित आरोपी सुहास गायकवाड याने तेथील ठेवलेल्या खो-याने सुनील देसाई यांच्या डोक्यात व अमृत देसाई यास डावे कानावर मारुन मारहाण करुन गंभीर जखमी केले होते.

याबाबत ६ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दि.७ रोजी सुहास गायकवाड यास अटक केली होती. त्यास न्यायालयात हजर केले असता दि. ०८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयातून जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.

जखमी अमृत देसाई यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना बुधवारी दि.२९ मे रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर भाटशिरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अमृत देसाई यांच्या पश्यात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

याबाबत संशयित आरोपी सुहास गायकवाड याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास हवालदार बी.एस. भोसले यांनी केला होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम हे करीत आहेत.

Web Title: Death of injured youth in beating, murder case registered; Suspect arrested in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.