अल्पवयीन मातेसह नवजात अर्भकाचा मृत्यू, मिरज शासकीय रुग्णालयातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:45 AM2023-01-17T11:45:36+5:302023-01-17T11:46:04+5:30
सांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण चिंताजनक
मिरज : मिरज शासकीय रुग्णालयात दाेन दिवसांपूर्वी अल्पवयीन मातेच्या पाेटी जन्मलेल्या नवजात अर्भकाच्या मृत्यूनंतर साेमवारी संबंधित मातेचाही मृत्यू झाला. संबंधित अल्पवयीन माता तासगाव तालुक्यातील असून, याबाबत रात्री उशिरापर्यंत पाेलिसांत नाेंद नव्हती.
संबंधित अल्पवयीन गर्भवतीस दाेन दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले हाेते. तिने एका अर्भकाला जन्म दिला, मात्र जन्मानंतर अर्भक दगावले. यानंतर गेल्या दाेन दिवसांपासून संबंधित मातेवर उपचार सुरू हाेते. मात्र, साेमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे.
मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात माहिती पाठविली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत पाेलिसांकडे नाेंद नव्हती.