सागरेश्वर अभयारण्यातील दोन हरणांचा मृत्यू, अभयारण्य प्रशासन अनभिज्ञ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 03:49 PM2022-12-28T15:49:46+5:302022-12-28T16:18:03+5:30

अभयारण्याच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हरीण मृत्यूमुखी पडले असतानाही याबाबत अभयारण्य प्रशासन अथवा प्रादेशिक वनविभागाला याची कल्पना नव्हती.

Death of two deer in Sagareshwar sanctuary, sanctuary administration unaware | सागरेश्वर अभयारण्यातील दोन हरणांचा मृत्यू, अभयारण्य प्रशासन अनभिज्ञ 

संग्रहीत फोटो

googlenewsNext

देवराष्ट्रे : यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याच्या आत व अभयारण्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. अभयारण्याच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हरीण मृत्यूमुखी पडले असतानाही याबाबत अभयारण्य प्रशासन अथवा प्रादेशिक वनविभागाला याची कल्पना नव्हती.

सागरेश्वर अभयारण्यात हरणांची संख्या अधिक आहे. अभयारण्याचे कुंपण अभयारण्याच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या तळ्याजवळ तुटलेले आहे. दोनशे ते तीनशे फूट सलग कुंपण तुटलेले असल्याने यातून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात अन्नाच्या शोधात बाहेर पडत आहेत. याच जागेतून मोकाट कुत्रीही अभयारण्यात प्रवेश करत आहेत. यामुळे अनेक हरणे मोकाट कुत्र्यांचे भक्ष्य बनत आहेत.

मंगळवारी अभयारण्याच्या आत एका हरिणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला, तर देवतळे परिसरात अभयारण्याबाहेर दुसरे हरिण मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. याबाबत प्रादेशिक वनविभाग अथवा अभयारण्य प्रशासनाला कोणतीच माहिती नव्हती. वनविभागाच्या निष्काळजीपणाने अनेक हरणांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत.

मृत्यूनंतरही तत्परता नाही

मंगळवारी सकाळी निदर्शनास आलेल्या दोन्ही हरणांच्या मृत्यूबाबत सायंकाळपर्यंत प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नव्हती. प्रादेशिक वनविभागाने मृत हरणाला नेण्यासाठी धडपड केली. विभागणी गाडी नसल्याने गाडीची शोधाशोध अधिकारी सायंकाळपर्यंत करीत होते.

Web Title: Death of two deer in Sagareshwar sanctuary, sanctuary administration unaware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली