सांगलीत कोरोना संशयित रूग्णाचा मृत्यू; आणखी चार कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:15 PM2020-05-24T12:15:23+5:302020-05-24T12:16:50+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चारने वाढली असून एका संशयित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. धारावीहून आलेली बारावर्षीय मुलगी व ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चारने वाढली असून एका संशयित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. धारावीहून आलेली बारावर्षीय मुलगी व सोनारसिध्दनगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आणखी चारजणांना कोरोना निदान झाले आहे.
मुंबईहून नांगोळे (ता. कवठेमहांकाळ), झोळंबी वसाहत आष्टा (ता. वाळवा), जांभुळणी (ता. आटपाडी), मोरेगाव (ता.शिराळा) येथील रूग्णांचा समावेश आहे. तर विटा येथे मुंबईहून आलेल्या ७२ वर्षीय वृध्द आले होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याने तब्येत बिघडल्याने त्यांना मिरजेत शनिवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले होते मात्र, मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या वृध्दाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहेत.