कर्जमाफीच्या व्याजाचे साडेआठ कोटी शेतकऱ्यांना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:26 AM2021-03-06T04:26:19+5:302021-03-06T04:26:19+5:30
ते म्हणाले, शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली होती. परंतु त्याच्या अंमलबजावणीस वेळ लागत होता. यामुळे जिल्हा ...
ते म्हणाले, शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली होती. परंतु त्याच्या अंमलबजावणीस वेळ लागत होता. यामुळे जिल्हा बँकेला मोठा फटका बसत होता. परिणामी जिल्हा बँकेत विकास सोसायट्यांकडून व्याज वसूल केले होते. त्यानंतर शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पार पाडली. बँकेने घेतलेले व्याज परत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ७६६ सोसायट्यांतील ६६ हजार २८ सभासदांना आठ कोटी ५२ लाख ८० हजार ३० रुपयांची परत केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. व्याज परत केलेल्या सोसायट्या, सभासद व रक्कम (लाखात) तालुकानिहाय अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे. शिराळा तालुक्यातील ९० सोसाट्यांमधील दोन हजार ८५२ सभासदांना २६ लाख ९८ हजार ७२४, वाळवा तालुक्यातील १३० सोसायट्यांचे सात हजार ५४ सभासदांना ८१ लाख ७० हजार ७७३, मिरज तालुक्यातील ६९ सोसायटीच्या नऊ हजार ३२ सभासदांना एक कोटी ३० लाख ५७ हजार ७३५, कवठेमहांकाळमधील ७० सोसायटीमधील आठ हजार ५६१ सभासदांना ९६ लाख तीन हजार ६२१, जतमधील ८२ सोसायटीमधील १४ हजार १४४ सभासदांना एक कोटी ७३ लाख २९ हजार ७२९, तासगावमधील ७८ सोसायटीच्या नऊ हजार ११६ सभासदांना एक कोटी २६ लाख दोन हजार ८६८, आटपाडीमधील ६९ सोसायटीच्या तीन हजार ३०८ सभासदांना ४६ लाख १५ हजार ५७१, खानापूर ५८ सोसायटीच्या चार हजार ३५ सभासदांना ४९ लाख ५२ हजार १३४, पलूसमधील ५० सोसायटीच्या चार हजार २६६ सभासदांना ६५ लाख ७४ हजार ६०८, कडेगाव तालुक्यातील ७० सोसायटीमधील तीन हजार ६६० सभासदांना ५६ लाख ५१ हजार २६७ रुपये परत दिले आहेत.