कर्जमाफी पायजे रं... कोन्चं बटण दाबू ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:44 PM2017-08-04T23:44:46+5:302017-08-04T23:44:49+5:30
महेंद्र गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचवड : वेगवेगळे निकष लावून राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकºयांना ही कर्जमाफी मिळविण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी असलेल्या महाईसेवा केंद्रांची मदत शेतकºयांना मिळत असून, कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असून, कर्जमाफी पायजे रं... कोन्च बटण दाबू, अशी चर्चा महाईसेवा केंद्रात सुरू आहे.
आॅनलाईन अर्ज सादर करताना बँका, सेवा सोसायटी व महाईसेवा केंद्रांमध्ये आॅनलाईन अर्जाचा नमुना उपलब्ध करण्यात आला असून, नमुना अर्ज परिपूर्ण भरून दिल्यानंतर त्यावरील माहिती आॅनलाईन अचूक भरली जात आहे.
एका बाजूला खरीप हंगामातील शेतीची रखडलेली कामे व दुसºया बाजूला कर्जमाफी मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे काम यामुळे शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील १३० महाईसेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरून दिले जात आहेत. कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पती-पत्नी व अठरा वर्षांखालील मुले अशी कुटुंबाची व्याख्या केली आहे.
आॅनलाईन अर्ज दाखल करण्याकरिता महाईसेवा केंद्रात जाताना शेतकºयांनी पती-पत्नीचे आधार कार्ड, बँकचे पासबुक, सेव्हिंग व लोन अकाऊंट दोन्हीही, पेन्शनर असतील तर पीपीओ नंबर व पॅनकार्ड उपलब्ध असल्यास सोबत ठेवणे गरजेचे आहे. जर मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक नसेल तर कर्जदाराने स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. शेतकºयांच्या कर्जाचा तपशील देण्याचे काम बँका, सेवा सोसायटी यांनी करणे गरजेचे आहे.
ज्या गावची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे, अशा गावांमधील शेतकºयांना त्यांची कर्जे थकल्यावर शासनामार्फत पुनर्गठन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु ५० पैशांवरील पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
अचूक तपशील देणे गरजेचे
सर्व बँका व विकास सेवा सोसायटी यांनी शेतकºयांना त्यांच्या कर्जाचा तपशील अचूक देणे गरजेचे आहे. बºयाचशा बँका शेतकºयांना त्यांना कर्जाचा योग्य तपशील देताना टाळाटाळ करीत असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास येत असून, बँकांची प्रशासनाने चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.