वाळवा तालुक्यात वृक्षसंवर्धन करण्याचा युवकांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:24+5:302021-07-24T04:17:24+5:30
आष्टा येथे युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विजयराव पाटील, देवराज पाटील, स्नेहा माळी, विराज ...
आष्टा येथे युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विजयराव पाटील, देवराज पाटील, स्नेहा माळी, विराज शिंदे, कार्तिक पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुक्यातील गावोगावी ५ हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत या रोपांची वाढ व जपणूक करू, असा निर्धार युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सुखी व समृद्ध समाज जीवनासाठी पर्यावरण संवर्धन व संरक्षण ही काळाची गरज असल्याचा संदेश युवा कार्यकर्त्यांनी दिला. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
वाळवा तालुका राष्ट्रवादी सोशल मीडिया, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व साखराळे येथील शंभुराजे ग्रुपने या वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन केले. वड, लिंब, आंबा, पेरू, चिक्कू व जांभुळ आदी ५ हजार रोपांचे वाटप करण्यात आले. त्यांनी आपआपल्या गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गावात वृक्षारोपण केले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, आष्ट्याच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी, संचालक विराज शिंदे, दिलीपराव पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठलराव पाटील, दादासाहेब मोरे, बँकेचे संचालक माणिक पाटील, संभाजी पाटील, कृष्णेचे संचालक जे. डी. मोरे, अविनाश खरात, उदय शिंदे, उमेश पवार, युवराज कांबळे, सरपंच प्रशांत चव्हाण या चळवळीत सहभागी झाले होते.
राजकेदार आटूगडे, सुशांत कुराडे, सुशांत कोळेकर, विशाल माने, अनिकेत पाटील, धीरज भाेसले, प्रशांत कदम, संदीप माळी, संदीप कदम, बिरू केसरकर, सुनील गवळी, सूरज कचरे, विश्वजित पाटील यांच्यासह सोशल मीडिया, विद्यार्थी सेल, व शंभुराजे ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हा वृक्षारोपणचा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले.