कोरोनाबाधितांत घट, जिल्ह्यातील बाधितांची संख्या लाखावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:25 AM2021-05-17T04:25:59+5:302021-05-17T04:25:59+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने रविवारी एक लाखांचा टप्पा पूर्ण केला. रविवारी नव्या रुग्णसंख्येत घट होत १०७७ जणांना कोरोनाचे ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने रविवारी एक लाखांचा टप्पा पूर्ण केला. रविवारी नव्या रुग्णसंख्येत घट होत १०७७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर १७९३ जणांनी कोरोनावर मात केल्याने दिलासादायक चित्र आहे. बाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी परजिल्ह्यांतील १५ सह जिल्ह्यातील ४३ असे ५८ मृत्यू झाल्याने मृत्यूसत्र अद्यापही कायम आहे.
बाधितांची संख्या एक हजाराच्या आसपास आल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ४३ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली ६, मिरज १, कुपवाड २, वाळवा तालुक्यात ११, जत ५, पलूस, मिरज तालुक्यात प्रत्येकी ४, कडेगाव, खानापूर तालुक्यात प्रत्येकी ३, कवठेमहांकाळ, शिराळा तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत २०६७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ६०७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३५०५ जणांच्या तपासणीतून ५४६ जण बाधित आढळले आहेत.
परजिल्ह्यांतील १५ जणांचा मृत्यू झाला असून ७६ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १००३८३
उपचार घेत असलेले १६२२६
कोरोनामुक्त झालेले ८१२३५
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २९२२
रविवारी दिवसभरात
सांगली १०८
मिरज ५७
तासगाव १८१
मिरज तालुका १५०
वाळवा १३१
जत ११८
आटपाडी ९८
खानापूर ७०
कडेगाव ५०
शिराळा ४३
कवठेमहांकाळ ३८
पलूस ३३
चौकट
बाधितांची संख्या एक लाखांवर
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने रविवारी एक लाखांचा टप्पा पार केला आहे. रविवारी एक लाख ३८३ बाधित झाले आहेत. यात ८१ हजार २३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर सध्या १६२६६ जण उपचाराखाली आहेत.