शिगावमध्ये घंटागाडीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:29 AM2021-09-23T04:29:45+5:302021-09-23T04:29:45+5:30
फोटो : शिगाव (ता. वाळवा) येथे घंटागाडीच्या लोकार्पणवेळी मनीषा गावडे व अरुण गावडे यांचा ग्रामसेवक एस. बी. साळुंखे व ...
फोटो : शिगाव (ता. वाळवा) येथे घंटागाडीच्या लोकार्पणवेळी मनीषा गावडे व अरुण गावडे यांचा ग्रामसेवक एस. बी. साळुंखे व सरपंच उत्तम गावडे यांनी सत्कार केला.
शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोग फंडातून व पंचायत समिती सदस्या मनीषा अरूण गावडे यांच्या फंडातून नवीन घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे. तिचे लोकार्पण नुकतेच झाले.
मनीषा गावडे म्हणाल्या, शिगावमध्ये स्वच्छतेचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच पंचायत समितीच्या माध्यमातून चार लाख ५० हजार रुपयांची तरतूद करून या घंटागाडीस प्राधान्य दिले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीसमोरील सुशोभीकरणासाठी पेविंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत.
सरपंच उत्तम गावडे म्हणाले, गावात लवकरच कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प हाती घेणार आहोत. या नवीन घंटा गाडीचा उपयोग आता प्रत्येक गल्लीत जाऊन कचरा गोळा करण्यासाठी होणार आहे.
यावेळी जितेंद्र पाटील, काशिलिंग गावडे, दिग्विजय पाटील, अजितराव बारवडे, निवास पाटील, अरूण गावडे, डॉ. सुभाष चौगुले, जयदीप गावडे, ग्रामविकास अधिकारी एस. बी. साळुंखे, तलाठी भास्कर पाटील उपस्थित होते.