औदुंबरच्या दत्त मंदिरासाठी चांदीची प्रभावळ अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:24 AM2021-03-22T04:24:07+5:302021-03-22T04:24:07+5:30
अंकलखोप : श्री क्षेत्र औदुंबर (ता. पलूस) येथील श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यासाठी ३० किलो चांदीची प्रभावळ भाविकांकडून अर्पण ...
अंकलखोप : श्री क्षेत्र औदुंबर (ता. पलूस) येथील श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यासाठी ३० किलो चांदीची प्रभावळ भाविकांकडून अर्पण करण्यात आली.
मंगलमय वातावरणात प्रभावळीचे गंध पुष्प अक्षता घालून विधिवत पूजन झाले. सर्व पुजारी मंडळींनी पौरोहित्य केले. यावेळी दत्त सेवाभावी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक येथील कै. दत्तात्रय गोपाळ देशपांडे व कै. सुमन दत्तात्रय देशपांडे यांच्या स्मरणार्थ पुणे येथील उद्योजक राजेंद्र देशपांडे यांनी ही चांदीची प्रभावळ श्री चरणी अर्पण केली.
यावेळी मेघा देशपांडे, निकीत देशपांडे, गिरिजा, इशानी देशपांडे यांच्यासह देशपांडे कुटुंबीय उपस्थित होते. पुणे येथील कारागीर गणेश बालवडकर व नितीन कराडे यांनी यंत्राचा वापर न करता केवळ हाताने प्रभावळ तयार केली आहे.
यावेळी श्री दत्त सेवा मंडळाचे सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारी उपस्थित होते.