ताकारीच्या चौथ्या आवर्तनास विलंब, कालवा अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:36 PM2019-05-13T12:36:32+5:302019-05-13T12:41:55+5:30

ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी पातळी मिळण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढविणे गरजेचे आहे. ३० एप्रिलरोजी तिसरे आवर्तन संपले आणि ताकारी योजना बंद झाली. आता मे महिन्यातील चौथे आवर्तन तातडीने मिळणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे व शेतीपिके करपून चालली आहेत.

Delay in the fourth round of expansion, ready to discontinue the work of canal accretion | ताकारीच्या चौथ्या आवर्तनास विलंब, कालवा अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी

ताकारीच्या चौथ्या आवर्तनास विलंब, कालवा अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी

Next
ठळक मुद्देताकारीच्या चौथ्या आवर्तनास विलंबकालवा अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी

प्रताप महाडिक 

कडेगाव : ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी पातळी मिळण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढविणे गरजेचे आहे. ३० एप्रिलरोजी तिसरे आवर्तन संपले आणि ताकारी योजना बंद झाली. आता मे महिन्यातील चौथे आवर्तन तातडीने मिळणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे व शेतीपिके करपून चालली आहेत.

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला असून याची गंभीर दखल घेऊन शासनाने सिंचन योजना चालू ठेवण्याची गरज आहे. वीज बिलांच्या शुल्कामध्ये टंचाईचा कोट्यवधी रुपयांचा खर्च बचत होण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणीपट्टी विहित वेळेत वसूल होते. त्यामुळे योजना सक्षमपणे व अविरतपणे कार्यरत राहिली. वीजबिलाच्या ८१-१९ फॉर्म्युल्यामुळे तर ही योजना अधिक सक्षम झाली. सध्या ताकारी योजनेची ९ कोटी ५० लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. परंतु साखर कारखान्यांकडून ७ कोटी रुपयांची वसूल झालेली पाणीपट्टी येणेबाकी आहे.

राज्य शासनाकडून टंचाई काळात दिलेल्या आवर्तनाची मागील आणि चालू वर्षाची ५ कोटी ८८ लाख इतकी येणेबाकी आहे. याशिवाय चालूवर्षी दिलेल्या आवर्तनाची ८१ टक्के याप्रमाणे २ कोटी इतकी वीजबिलाची रक्कम येणेबाकी आहे. यामुळे योजना सक्षम असताना, आवर्तन बंद का, असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होण्यास होणाऱ्या विलंबाचे खापर कालवा अस्तरीकरणाच्या सुरू असलेल्या कामावर फोडले जात आहे. परंतु आवर्तन कालावधित अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी केली आहे.

Web Title: Delay in the fourth round of expansion, ready to discontinue the work of canal accretion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.