पूरबाधित कुटूंबाना 53 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:40 PM2019-08-31T12:40:53+5:302019-08-31T12:43:09+5:30

सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 43 हजार 366 व शहरी भागातील 37 हजार 938 कुटूंबांना 40 कोटी 65 लाख 20 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.

Delivery of more than 53 crore sanitary grants to flooded families | पूरबाधित कुटूंबाना 53 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत

पूरबाधित कुटूंबाना 53 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत

Next
ठळक मुद्देपूरबाधित कुटूंबाना 53 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीतजीवनावश्यक वस्तूंचे 24 हजार 836 किट वितरीत

सांगली : सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 43 हजार 366 व शहरी भागातील 37 हजार 938 कुटूंबांना 40 कोटी 65 लाख 20 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील 22 हजार 629 व शहरी भागातील 2033 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 13 कोटी 34 लाख 75 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटपाचे काम सर्व गावांत युध्दपातळीवर सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

27 हजार 9 घरांची पडझड

पूरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 9 हजार 86 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 17 हजार 923 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 1908 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू असून शहरी भागातही मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे, वाणिज्यिक पंचनामे सुरू झाले आहेत. पूरबाधित वाणिज्य मिळकतीची नुकसान झालेली 88 गावे बाधित असून 16 हजार 521 मिळकती आहेत. त्यापैकी 12 हजार 606 पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे गतीने सुरू आहेत.

पूरबाधित 71 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

दिनांक 29 ऑगस्ट अखेर 71 हजार 996 कुटुंबांना एकूण 7199.6 क्विंटल गहू व 7199.6 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 56 हजार 724 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 2 लाख 83 हजार 620 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.

50319.23 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा

पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 97 हजार 742 शेतकऱ्यांच्या 50370.77 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.

97 पाणीपुरवठा योजना सुरू

जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सध्या 97 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात 19 गावांसाठी एकूण 19 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचे 24 हजार 836 किट वितरीत

राज्यभरातून जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या विविध मदतीचे वितरण महानगरपालिका व पूरबाधित तालुक्यांना करण्यात आले आहे. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे 24 हजार 836 किटचे वितरण करण्यात आले आहे.

अजूनही किट बनविण्याचे काम सुरू असून जसजसे किट तयार होतील तसे त्याचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 24 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 305 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 53.19 कोटी इतका आहे.

52 हजाराहून अधिक पशुधनावर लसीकरण

जिल्ह्यात पूरबाधित कुटूंबातील आजअखेर 52 हजार 185 पशुधनावर लसीकरण व 27 हजार 104 पशुधनावर उपचार करण्यात आले आहेत. तर 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.

बाधित कुटुंबातील गाय व म्हैस वर्गीय 380 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर 119 जनावरे, उंट, घोडा व बैल वर्गीय 7 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर वर्गीय 131 जनावरे, कोंबड्या व इतर पक्षी 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले आहे. नुकसानीची अंदाजित रक्कम 1 कोटी 42 लाख 82 हजार 400 इतकी आहे.

जिल्हाभरातील 290 दुधाळ जनावरांचे 74 लाख 31 हजार, ओढकाम करणाऱ्या 112 जनावरांचे 18 लाख 30 हजार व 13 हजार 481 कोंबड्या व कुक्कुट वर्गीय प्राण्यांचे 1 लाख 10 हजार 200 असे आतापर्यंत एकूण 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.

पूरबाधित जनावरांसाठी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून 2 हजार 279 मे. टन चारा प्राप्त झाला आहे. सांगली जिल्हाकरिता 208.75 मे. टन पशुखाद्य प्राप्त झाले असून सदरचा चारा व पशुखाद्य आवश्यकतेप्रमाणे बाधित गावांमध्ये वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Delivery of more than 53 crore sanitary grants to flooded families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.