कृषिपंपाच्या केबल चोरांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:27 AM2021-05-12T04:27:08+5:302021-05-12T04:27:08+5:30
नागरिक बिनधास्त सांगली : ग्रामीण भागामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढत आहे. ...
नागरिक बिनधास्त
सांगली : ग्रामीण भागामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढत आहे. मनुष्यबळाची कमतरता जाणवत असताना, त्यांना नागरिकांनी घरात बसून सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करत आहेत. अनेक जण मास्कचाही वापर करत नाहीत. त्यामुळे अशा लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.
प्लास्टीक पिशव्यांचा खुलेआम वापर
सांगली : महापालिका क्षेत्रात प्लास्टीकच्या विरोधात चांगली मोहीम राबविली होती. प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर वारंवार कारवाईही करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांवर वचक बसला होता. मात्र, कोरोनाची साथ आलेली असल्याने प्रशासन या कामात व्यस्त आहेत. याचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी प्लास्टीक पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. ग्राहकांनी मागणी नाही केली, तरी फळविक्रेते प्लास्टीक पिशव्या देत आहेत. त्यामुळे सरसकट कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.