महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:52+5:302021-05-18T04:26:52+5:30
मिरज : सोशल मीडियावरून महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपाइं, राष्ट्रवादी काँग्रेस, भीमआर्मी व बहुजन ...
मिरज : सोशल मीडियावरून महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपाइं, राष्ट्रवादी काँग्रेस, भीमआर्मी व बहुजन समाजवादी पार्टीतर्फे करण्यात आली आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
सोशल मीडियावर महापुरुषांची व्यंगचित्रे व अपमानास्पद लेख प्रसिद्ध करणाऱ्या विकृत बुद्धीच्या समाजकंटकांचा सर्व पक्ष, संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. महापुरुषांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन ॲट्रासीटीचे गुन्हे दाखल करावेत अन्यथा सर्व आंबेडकरी बहुजन संघटना जिल्हा बंद आंदोलन करणार असल्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस जैलाब शेख, रिपाइं जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, शहराध्यक्ष अविनाश कांबळे, प्रमोद वायदंडे, बहुजन समाजवादी पार्टीचे सलिम अत्तार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.