पीक नुकसानीच्या पंचनाम्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:15+5:302021-07-26T04:24:15+5:30
कोकरुड : चार दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील सर्व पिकांचे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून ...
कोकरुड : चार दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील सर्व पिकांचे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सांगली जिल्हा भाजपा ओबीसी अध्यक्ष शरद गुरव, हत्तेगाव सेवा सोसायटीचे अध्यक्ष बजरंग वाघमारे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात भात, मका, भुईमूग, सोयाबीन आदी पिके पाण्याबरोबर वाहून गेली आहेत. मका मोडून पडला आहे. परिसरातील सर्व ओढे तुडुंब भरून वाहिल्याने ओढ्याकाठी असणारी सर्व शेती पिकासह वाहून गेली आहे. खरीप हंगामात पेरणी करून उगवलेली ८० टक्क्यांपेक्षा जास्त पिके खराब झाली आहेत. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी के. वाय. भाष्टे, शंकर पाटील, विकास सावंत यांनी केली आहे.