गिरलिंगवरील बौद्ध लेण्यांच्या विकासाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:29+5:302021-03-18T04:26:29+5:30

कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील गिरलिंग डोंगरावरील बौद्ध लेण्यांचा विकास करावा अशी मागणीचे निवेदन बौद्ध लेणी संरक्षण संवर्धन समितीच्या वतीने ...

Demand for development of Buddhist caves at Girling | गिरलिंगवरील बौद्ध लेण्यांच्या विकासाची मागणी

गिरलिंगवरील बौद्ध लेण्यांच्या विकासाची मागणी

Next

कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील गिरलिंग डोंगरावरील बौद्ध लेण्यांचा विकास करावा अशी मागणीचे निवेदन बौद्ध लेणी संरक्षण संवर्धन समितीच्या वतीने विपुल वाघमारे यांनी तहसीलदार बी. जे. गोरे यांना दिले आहे.

कुकटोळी येथील गिरलिंग डोंगरावर किमान १६०० च्या दशकातील बौद्ध लेण्यांचा शोध लागून चार ते पाच वर्षे झाली. तरी अद्याप शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याठिकाणी पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात पण तिथे पाण्याची व्यवस्था नाही. लाईट, रस्ता, बौद्ध विहार या सर्व व्यवस्था शासनाने कराव्या अशी मागणी निवेदनावर केली.

यावेळी नगरसेवक लालासाहेब वाघमारे, विशाल वाघमारे, नालंदा लोंढे, बबलू लोंढे, सचिन वाघमारे, संतोष मोरे, जगन्नाथ माने आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for development of Buddhist caves at Girling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.