वाळव्यात काेराेनाबाबत सुविधांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:29 AM2021-05-06T04:29:10+5:302021-05-06T04:29:10+5:30
ओळ : वाळव्यात सर्वपक्षीय नेत्यांनी साेयी-सुविधांबाबत ग्रामविकास अधिकारी एम. पी. हताळे यांना निवेदन दिले. लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : ...
ओळ :
वाळव्यात सर्वपक्षीय नेत्यांनी साेयी-सुविधांबाबत ग्रामविकास अधिकारी एम. पी. हताळे यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याअंतर्गत उपकेंद्रांमध्ये अडीचशे कोरोनाचे रुग्ण आहेत. वाळवा, पडवळवाडी, शिरगाव, नवेखेड, जुनेखेड व अहिरवाडी ही गावे वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येतात. एकट्या वाळव्यात १८३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आहेत.
कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वाळव्याला कोरोना कक्ष उभारण्यात यावा, विलगीकरणाची योग्य ती सोय करावी, रुग्णवाहिकेची सोय करावी आदी मागण्यांचे निवेदन सर्वपक्षीय युवा नेत्यांनी ग्रामविकास अधिकारी एम. पी. हताळे यांना दिले.
यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धनाजी शिंदे, युवक काँग्रेसचे वाळवा शहर अध्यक्ष अक्षय फाटक, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रम शिंदे, मनसेचे तालुका विभाग अध्यक्ष सचिन कदम, मनसे विद्यार्थी सेनेचे संकेत डवंग यांनी हे निवेदन दिले.