ढगेवाडी तलावाजवळ भराव करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:07+5:302021-04-13T04:25:07+5:30
ढगेवाडी( ता. वाळवा) येथील पाझर तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे जमीन खचली आहे. लोकमत न्यूज नेटवर्क ऐतवडे बुद्रुक : ढगेवाडी ...
ढगेवाडी( ता. वाळवा) येथील पाझर तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे जमीन खचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ऐतवडे बुद्रुक : ढगेवाडी (ता. वाळवा) येथील पाझर तलावाच्या सांडव्यातून पडणाऱ्या पाण्यामुळे जमीन खचली आहे. त्यामुळे तलावास धोका निर्माण झाला आहे. तरी खचलेल्या जमिनीचा भराव करून मिळावा, अशी मागणी शंकर कचरे व ग्रामस्थांनी केली आहे.
पाझर तलावामुळे ढगेवाडीच्या पिण्याच्या पाण्याचा व पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा तलाव तुडुंब भरतो. तलाव भरल्यानंतर तलावाचे सांडव्यातून पाणी बाहेर पडते. बाहेर पडणाऱ्या जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे सांडव्याखालील जमीन खचू लागली आहे. यामुळे तलावास धोका निर्माण झाला आहे, तरी संबंधित विभागाने तातडीने खचलेल्या जमिनीच्या भरावाचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.