कामेरी येथील जोडरस्त्याचे काम करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:50+5:302020-12-30T04:35:50+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील मातंग समाज ते दलित वस्तीला जोडणारा रस्ता गेल्या १० वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. ...
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील मातंग समाज ते दलित वस्तीला जोडणारा रस्ता गेल्या १० वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असून लवकरच काम सुरू होईल, असे जिल्हा परिषदेच्या व पंचायत समिती सदस्यांकडून सांगण्यात येत आहे. हे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाज-चर्मकार समाज-बाजीनाना घर ते आंबेडकर नगरपर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. या मार्गावरून सध्या उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून भरले होते. ते पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे वाहनांचा आवाज व धुळीमुळे या परिसरातीेल नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे काम राजकीय हेतूने दीर्घकाळ प्रलंबित ठेवून या भागातील ग्रामस्थांना रस्तामंजुरी व लवकरच काम सुरू होईल, अशी तोंडी आश्वासने न देता लोकप्रतिनिधींनी तत्काळ रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
यावर रमेश पाटील, सचिन पाटील, विजयसिंह पाटील, सर्जेराव नांगरे, सुखदेव क्षीरसागर, शुभम पाटील, सागर तांबीट, दिलीप वायदंडे, मारुती सकटे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
फाेटाे : २९१२२०२०-आयएसएलएम- कामेरी रस्ता न्यूज