संग्राम उद्योग समूहाकडून कोविड सेंटरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:40+5:302021-05-12T04:26:40+5:30

ते म्हणाले, संग्राम उद्योग समूह व पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीच्या विद्यमाने पलूसमधील सर्व उद्योजक, व्यापारी, दानशूर व्यक्तींना सोबत ...

Demand for Kovid Center from Sangram Industries Group | संग्राम उद्योग समूहाकडून कोविड सेंटरची मागणी

संग्राम उद्योग समूहाकडून कोविड सेंटरची मागणी

Next

ते म्हणाले, संग्राम उद्योग समूह व पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीच्या विद्यमाने पलूसमधील सर्व उद्योजक, व्यापारी, दानशूर व्यक्तींना सोबत घेऊन संग्राम लॉन्स येथे ३० आयसोलेशन बेड आणि २० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभे करण्याची परवानगी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना मागण्यात आली आहे.

प्रशासनाच्या सहकार्याने सदरच्या उपक्रमामध्ये शासनाकडून डॉक्टर, नर्सेस त्याचबरोबर शासकीय औषधे पुरवण्यात यावीत जेणेकरून आजची परिस्थिती पाहता नागरिकांना बेड मिळत नाही, तसेच हाॅस्पिटलमध्ये होणारा खर्च पण सर्वसामान्य लोकांना न परवडणारा आहे. एकीकडे सर्व व्यवहार पूर्णपणे या लाॅकडाऊनमुळे बंद आहेत आणि हा दवाखान्याचा खर्च त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने नाममात्र फीमध्ये हाॅस्पिटल सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष नीलेश विठ्ठलराव येसुगडे, संग्राम पतसंस्थेचे उपाध्यक्ष भरत गोंदिल, पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक दिलीप जाधव, नगरसेवक कपिल गायकवाड, संग्राम सोसायटीचे संचालक गजानन धुमके व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Demand for Kovid Center from Sangram Industries Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.