मिरज रेल्वे जंक्शनच्या अण्णा भाऊ साठे नामकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:47+5:302020-12-31T04:26:47+5:30
मातंग समाजातर्फे १९९९ पासून रेल्वे स्थानकाच्या नामकरणाची मागणी करण्यात येत आहे. यासाठी वीस वर्षांपूर्वी रेल रोको आंदोलन करण्यात ...
मातंग समाजातर्फे १९९९ पासून रेल्वे स्थानकाच्या नामकरणाची मागणी करण्यात येत आहे. यासाठी वीस वर्षांपूर्वी रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. दहा वर्षांपूर्वी मिरज जंक्शन स्थानकात ‘अण्णाभाऊ साठे जंक्शन’ असा फलक लावून आंदोलन करण्यात आले होते. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांनी मागणीची दखल घेतली नसल्याने मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री विरोधी पक्षनेत्यांनाही निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर मिरजेत मातंग समाजाच्या बैठकीत मिरज जंक्शन स्थानकास आण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस अण्णाभाऊ साठे नामकरण संघर्ष कृती समितीचे
भीमराव बेंगलोरे, बबन साठे, प्रशांत ढंग, संजय कांबळे, गणेश वायदंडे, डाॅ. प्रशांत लोखंडे, अर्जुन कांबळे, नाना भोसले, लीना यादव, सुधाकर गायकवाड, संध्या आवळे, प्रशांत सदामते, आकाश तिवडे, आकाश चंदनशिवे, विद्याधर लोखंडे, शंकर कांबळे ,रोहीत सतेनावर,वंदना चंदनशिवे ,गेब्रियल तिवडे, सचिन मोरे, लखन धोंगडे , सचिन केचे, अर्जुन मजले, हेमंत मोहिते, महादेव साठे उपस्थित होते.
फाेटाे : ३० मिरज १