मिरज जंक्शनला महात्मा बसवेश्वराचे नाव देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:18 PM2020-12-26T17:18:34+5:302020-12-26T17:21:08+5:30

railway Sangli News- देशभरात रेल्वेने जाण्याची सोय असणार्या मिरज रेल्वे जंक्शनला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाने केली आहे. सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्यावतीने खासदार धैर्यशील माने व खासदार संजय मंडलीक यांना त्यासाठी साकडे घालण्यात आले.

Demand for naming Miraj Junction after Mahatma Basaveshwar | मिरज जंक्शनला महात्मा बसवेश्वराचे नाव देण्याची मागणी

मिरज जंक्शनला महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह लिंगायत कार्यकर्त्यांनी खासदार संजय मंडलीक यांना निवेदन दिले.

Next
ठळक मुद्देमिरज जंक्शनला महात्मा बसवेश्वराचे नाव देण्याची मागणीखासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलीक यांना साकडे

सांगली : देशभरात रेल्वेने जाण्याची सोय असणार्या मिरजरेल्वे जंक्शनला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाने केली आहे. सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्यावतीने खासदार धैर्यशील माने व खासदार संजय मंडलीक यांना त्यासाठी साकडे घालण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी नगरसेवक डॉ. महादेव कुरणे, नगरसेवक संजय मेंढे, नगरसेवक गणेश माळी, बी. एस. पाटील, नगरसेविका उमा बनछोडे, गजेंद्र कल्लोळी, जयश्री कुरणे, जयगोंड कोरे, प्रमिला नवले, बाबासाहेब आळतेकर, जितेंद्र ढोले, ईश्वर जनवाडे, वैशाली माळी, विठ्ठल परीट, उमेश हारगे, विनायक शेरबंदे आदींनी भेट घेऊन निवेदन दिले.

पदाधिकार्यांनी सांगितले की, मिरजेसह कर्नाटक सीमाभागात लाखोंच्या संख्येने लिंगायत समाज राहतो. त्यांचे आराध्य दैवत असलेल्या महात्मा बसवेश्वरांचे नाव मिरज जंक्शनला देण्याने समाजाची एक मुख्य मागणी पूर्ण होईल. गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी पाठपुरावा आहे.

देशभरात दिल्ली, मुंबई अशा अनेक जंक्शन स्थानकांना विविध महात्म्यांची नावे देण्यात आली आहेत, त्याच धर्तीवर मिरज जंक्शनचेही नामकरण करावे. कर्नाटकातील हजारो प्रवासी दररोज मिरज जंक्शनमधून प्रवास करतात. जंक्शनच्या नामकरणाने त्यांचीही मागणी पूर्ण होणार आहे. नामकरणासाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंडलीक व माने यांनी दिले.
 

Web Title: Demand for naming Miraj Junction after Mahatma Basaveshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.