रस्त्याकडेची काटेरी झुडपे काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:22 AM2021-01-14T04:22:37+5:302021-01-14T04:22:37+5:30

जत : जत तालुक्यातील ग्रामीण व जिल्हा मार्गावर रस्त्याकडेला असणारे मार्गदर्शक सूचना फलक काटेरी झुडपे व गावतामध्ये झाकले गेले ...

Demand for removal of roadside thorn bushes | रस्त्याकडेची काटेरी झुडपे काढण्याची मागणी

रस्त्याकडेची काटेरी झुडपे काढण्याची मागणी

Next

जत : जत तालुक्यातील ग्रामीण व जिल्हा मार्गावर रस्त्याकडेला असणारे मार्गदर्शक सूचना फलक काटेरी झुडपे व गावतामध्ये झाकले गेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वळण, गाव, शाळा, पूल याचा अंदाज येत नाही. यातून लहान-मोठे अपघात होत आहेत.

गावालगत रस्त्याकडेला दुतर्फा काटेरी झुडपे वाढली आहेत. यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. ही झुडपे प्रवासी नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहेत. बहुतांश रस्ते पक्के व कच्चे आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे रस्त्याकडेला दुतर्फा काटेरी झुडपे व गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सूचना फलक दिसेनासे झाले आहेत. काटेरी झुडपे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना शासनाने आदेश द्यावेत व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Web Title: Demand for removal of roadside thorn bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.