सॅनिटाईज करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:26 AM2021-04-17T04:26:11+5:302021-04-17T04:26:11+5:30
------------ सूचनांकडे दुर्लक्ष कडेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ...
------------
सूचनांकडे दुर्लक्ष
कडेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु, अनेक नागरिक मास्क न घालता बाहेर पडत असून, गर्दीही केली जात आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
-------------
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
जत : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अवैध दारूविक्रीमुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असून, तळिरामांमुळे भांडणतंट्यांतही वाढ होत आहे. याचा महिला, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
---------------
वृक्षतोडीवर प्रतिबंध घालण्याची मागणी
सांगली : वनविभाग व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. परंतु जिल्ह्यातील वनांचे प्रमाण वृक्षतोडीमुळे कमी झाले आहे. परिणामी प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.