मिरजेत धूर फवारणी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:24 AM2021-04-14T04:24:18+5:302021-04-14T04:24:18+5:30

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला पलूस : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार ...

Demand for smoke spraying in Miraj | मिरजेत धूर फवारणी करण्याची मागणी

मिरजेत धूर फवारणी करण्याची मागणी

Next

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला

पलूस : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याकडेला ही कुत्री कळपाने असतात. या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.

सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन

आटपाडी : रासायनिक खतांमुळे शेतीचे होणारे नुकसान पाहता, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमीन सुपीक राहते. जमिनीचा कस टिकून राहतो. हळूहळू शेतीतील उत्पादन वाढत जाते. सेंद्रिय शेती करण्यासाठी पशुधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतीला आवश्यक असे सर्व पोषक घटक शेणखतातून उपलब्ध होतात. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.

तासगावमध्ये बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी

तासगाव : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक रुग्ण कोरोनाबाधित निघत असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन अशा संशयित व्यक्तींची तपासणी केली जात आहे. आरोग्य प्रशासनाचे कोरोनाबाबत योग्य ती दखल घेत आहे.

रेडिअमअभावी अपघाताची शक्यता

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडिअम लावले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. यामुळे अपघात होतात. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. यामुळे अशा रस्त्यांवर अपघात टाळण्यासाठी रेडिअम बसविण्याची मागणी होत आहे.

आठवडा बाजार बंंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नरवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आठवडा बाजार बंद करण्यात करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे मिरज तालुक्यातीलही सर्व बाजार बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचे मोठे नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा

संजयनगर : गत काही महिन्यांत वाहनांची संख्या वाढल्याने तसेच वाहतूक नियमांचे पालन न करण्यात येत असल्याने अपघात वाढले आहेत. हेल्मेट नसल्याने अनेक दुचाकीस्वार प्राणाला मुकतात. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. याबाबत वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यास प्रतिसाद गरजेचा आहे.

Web Title: Demand for smoke spraying in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.