कुंडलवाडीत बस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:20+5:302021-03-05T04:26:20+5:30
तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे बस सुरू करण्याच्या मागणीकडे एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सरपंचांच्या मागणी अर्जावर दोन ...
तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे बस सुरू करण्याच्या मागणीकडे एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सरपंचांच्या मागणी अर्जावर दोन महिने विचारच केलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
कुंडलवाडी गाव शिराळा विधानसभा मतदारसंघात आणि शिराळा एसटी आगाराच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रकांना सरपंच रहिमशा फकीर यांनी एसटी बस सुरू करण्याच्या मागणीचा अर्ज दि. १५ जानेवारी रोजी दिला आहे. पण त्यावर कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. शैक्षणिक संकुले सुरू झाली आहेत. विद्यार्थी येणे-जाणे वाढले आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असल्याने बरेच वाहनधारक बसनेच प्रवास असा विचार करीत आहेत. पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाने एसटी सुरू नसल्याची चर्चा आहे. मुंबईसह इतर ठिकाणी बसचालक वाहकांसह गेल्याने बस अपुऱ्या पडत असल्याचीही चर्चा सुरू आहे.