रेल्वे कृती समितीतर्फे पॅसेंजर, एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:26 AM2021-01-23T04:26:35+5:302021-01-23T04:26:35+5:30
मिरज-कोल्हापूर, मिरज-बेळगाव, मिरज-पंढरपूर पॅसेंजर व मिरज-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, मिरज-सोलापूर एक्स्प्रेस सुरू करावी. लोकलची शटल सेवा सुरू ...
मिरज-कोल्हापूर, मिरज-बेळगाव, मिरज-पंढरपूर पॅसेंजर व मिरज-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, मिरज-सोलापूर एक्स्प्रेस सुरू करावी. लोकलची शटल सेवा सुरू करावी. मिरज-कृष्णाघाट रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू करावे. रेल्वेस्थानकात जादा आरक्षण खिडकी सुरू करावी. मिरज रेल्वे जंक्शनचा विकास व मिरज-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेससह सर्व एक्स्प्रेस सुरू कराव्यात. मिरज-पुणे दुहेरीकरण व विद्युतीकरण, मिरज-लोंढा दुहेरीकरण, विद्युतीकरण जलद पूर्ण करावे. मिरज स्टेशनवर वातानुकूलित वेटिंग रूम बांधणे, स्थानकाबाहेरील गुन्हेगारीस आळा घालावा, स्थानकातील बंद बॅगेज स्कॅनर मशीन सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन रेल्वे कृती समितीतर्फे महाव्यवस्थापक मित्तल यांना देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष मकरंद देशपांडे, उपाध्यक्ष गजेंद्र कल्लोळी व सचिव सुकुमार पाटील, ज्ञानेश्वर पोतदार, राजेश कुकरेजा, नितीन आवटी, जे.ए. पाटील व सुरेश आवटी उपस्थित होते.
फाेटाे : २२ मिरज ४