लिंगनूर आरोग्य केंद्रात लसीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:24+5:302021-04-26T04:23:24+5:30
मिरज पूर्व भागातील आरग, बेडग, शिंदेवाडी, खटाव येथील आरोग्य केंद्रांमधून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. मात्र लिंगनूर ...
मिरज पूर्व भागातील आरग, बेडग, शिंदेवाडी, खटाव येथील आरोग्य केंद्रांमधून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. मात्र लिंगनूर येथील आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू नसल्याने येथील नागरिकांना आरग येथील आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी लागत आहे. आरग येथे लसीचा तुटवडा असल्याने सकाळीच लस संपते. परिणामी लिंगनूर येथील नागरिकांना रांगेत थांबून लस न घेताच परत यावे लागत आहे. परिसरातील अन्य आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असताना लिंगनूरमध्ये लसीकरण मोहीम का सुरू नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. लसीकरण लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
काेट:
सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढ चालली असल्याने नागरिकांचे लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. गावातील नागरिकांना आरग आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी जावे लागत आहे. महिला, वयाेवृद्ध नागरिकांची गैरसोय होत असल्याने ते लस घेण्यापासून वंचित राहत आहेत. आरोग्य विभागाने लिंगनूर आरोग्य केंद्रात त्वरित लसीकरण सुरू करावे.
- विमल मगदूम, सदस्य, ग्रामपंचायत, लिंगनूर