कवठेएकंदमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांच्या लसीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:20+5:302021-04-21T04:26:20+5:30
ओळ : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे किरकोळ व्यापाऱ्यांनी लसीकरणाबाबत सरपंच राजेंद्र शिरोटे, उपसरपंच शर्मिला घाइल यांना निवेदन दिले. कवठेएकंद ...
ओळ :
कवठेएकंद (ता. तासगाव) येथे किरकोळ व्यापाऱ्यांनी लसीकरणाबाबत सरपंच राजेंद्र शिरोटे, उपसरपंच शर्मिला घाइल यांना निवेदन दिले.
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे छोटे-मोठे व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते यांना प्राधान्याने कोराेना प्रतिबंधक लसीकरण देण्यात यावे, अशी मागणी कवठेएकंद येथील व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कवठेएकंद आरोग्य उपकेंद्रातर्फे ४५ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू आहे. अत्यावश्यक सेवा व अन्य व्यावसायिकांना तसेच डेअरी व्यवसाय चालकांना, सेवकांना लसीकरण आवश्यक आहे. यासाठी सर्व वयोगटातील व्यापाऱ्यांना लसीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सरपंच राजेंद्र शिरोटे, उपसरपंच शर्मिला घाईल, सदस्य चंद्रकांत नागजे, सुषमा बाबर, ग्रामविकास अधिकारी जाधव यांच्याकडे देण्यात आले.
निवेदनात छोट्या व्यावसायिकांचे लॉकडाऊनमुळे नुकसान होत आहे. गर्दी होत नसणाऱ्या व्यावसायिकांना मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्यापारी अशोक मालगत्ते, सचिन सांगले, स्वप्नील तोडकर, बाबासाहेब पाटणे, किरण शेटे, प्रदीप पोतदार, शिवम तोडकर आदी उपस्थित होते.