अंकलखोपला राज्यमार्गावरील चौकाच्या रुंदीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:07+5:302021-04-16T04:27:07+5:30
अंकलखोप : टोप ते दिघंची या मार्गाचे रुंदीकरण अतिशय वेगाने सुरू आहे. मात्र या मार्गावरील अंकलखोप (ता. पलूस) येथील ...
अंकलखोप : टोप ते दिघंची या मार्गाचे रुंदीकरण अतिशय वेगाने सुरू आहे. मात्र या मार्गावरील अंकलखोप (ता. पलूस) येथील चौकाचे रुंदीकरण व गटारीचे पाणी वाहून जाण्यासाठी मोठ्या व्यासाच्या वाहिन्या घालण्याची मागणी होत आहे.
अंकलखोप येथील विठ्ठलनगरमधील चौकात पाणी वाहून जाण्यासाठी वाहिन्या आहेत. त्यातून पाणी वाहून जाण्यात अडथळा येतो. त्यामुळे रस्त्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात पाणी साठते. पावसाचे पाणी रस्त्याच्या भिंतीला तटल्यामुळे पिकांत व दुकानात घुसते. यासाठी या चौकात पूर्व-पश्चिम मोठ्या व्यासाच्या वाहिन्या घालण्याची मागणी होत आहे.
सध्या या रस्त्याचे रुंदीकरण पूर्वीपेक्षा दुप्पट केले आहे. मात्र चौकाचे रुंदीकरण कमी केले आहे. आष्टा-तासगाव रस्त्यावरील अंकलखोप येथील या चौकात अनेक खाद्यपदार्थांच्या हातगाड्या असतात. त्यामुळे खवय्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यातच आष्टा येथून रस्ता विनाअडथळा आल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ती वेगाने होणार आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढणार आहे. चौकाचे रुंदीकरण आवश्यक आहे. यासंबंधीचे निवेदन ठेकेदाराला दिले आहे. पण ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे.