‘हुतात्मा’ची ऑनलाईन वार्षिक सभा बेकायदेशीर ठरविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:19+5:302021-04-07T04:28:19+5:30
वाळवा : येथील येथील हुतात्मा साखर कारखान्याची ३१ मार्च राेजी झालेली ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा कोरम नसताना घाईगडबडीत गुंडाळण्यात ...
वाळवा : येथील येथील हुतात्मा साखर कारखान्याची ३१ मार्च राेजी झालेली ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा कोरम नसताना घाईगडबडीत गुंडाळण्यात आली. ८ हजार सभासदांपैकी ६८ सभासद ऑनलाईन पद्धतीने हजर होते. कारखान्याचा वार्षिक अहवाल व नोटीस सभासदांना वेळेत दिली नाही. जेणेकरून सभासदांना आपल्या शंका व प्रश्न दिलेल्या मुदतीत विचारता आले नाहीत. यामुळे ही सभा बेकायदेशीर ठरवून रद्द करावी, अशी मागणी चंद्रशेखर शेळके व नंदकुमार शेळके यांनी सहकारमंत्री, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाईन सभेबद्दलची तांत्रिक माहिती कारखाना व्यवस्थापनाने सभासद शेतकऱ्यांना दिली नाही. वार्षिक सभेला संचालक मंडळ, अधिकारी वर्गासह ८ हजार सभासद असताना फक्त ६८ सभासद ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. त्यात काही सभासद नसलेले लाेक होते.
कारखान्याच्या वार्षिक सभेविषयी पुराव्यानिशी आमची तक्रार आपण दखलपात्र ठरवून ही सभा बेकायदेशीर ठरवावी. ती रद्द करून पुन्हा नव्याने सभा घेण्याचे आदेश द्यावेत. या चुकीबद्दल कारखाना प्रशासनावर कारवाई करावी.