राजकीय पक्ष टिकले, तरच लोकशाही टिकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:12 AM2017-08-02T01:12:06+5:302017-08-02T01:12:06+5:30

Democracy can only survive if the political parties survive | राजकीय पक्ष टिकले, तरच लोकशाही टिकेल

राजकीय पक्ष टिकले, तरच लोकशाही टिकेल

Next
ठळक मुद्देपूर्वजांनी तयार केलेली आर्थिक व्यवस्था कोणालाही तोडता येणार नाही.
ोकमत न्यूज नेटवर्कवाटेगाव : देशात राजकीय पक्ष टिकले, तरच लोकशाही टिकेल. त्यामुळे सत्तेच्या केंद्रात विविधता राहील अन्यथा राजेशाही निर्माण होईल, म्हणूनच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक रहा, असे प्रतिपादन माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केले.वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, आज देशात द्वेषाचे राजकारण चालले आहे. ते कोणाच्याही भल्याचे नाही. आजचे युग हे आर्थिक युग आहे. तेव्हा त्याचा अभ्यास करावा लागेल. पूर्वजांनी तयार केलेली आर्थिक व्यवस्था कोणालाही तोडता येणार नाही.डॉ. भारत पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासमोरील पुतळ्यास माजी खासदार प्रकाश आंबेडकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी बांधकाम सभापती रवींद्र बर्डे, सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच प्रमोद साठे, राहुल पाटील, राहुल चव्हाण, संपतराव मुळीक, किरण नांगरे, संपतराव देसाई, हेमंत मुळीक, जयेश मोहिते, सचिन बर्डे, जनार्दन साठे, महावीर बापुळे, संदीप साठे, अण्णा भाऊंच्या स्नुषा सावित्री साठे, नातू सचिन साठे, फकिरा साठे, विजय लोंढे, संजय खवळे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सविता लष्करे, गटविकास अधिकारी राहुल गावडे, ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब पाटील, ग. चि. ठोंबरे, तलाठी राजेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी एस. डी. सातवेकर, सचिन बागडे यांनी अभिवादन केले.वाटेगाव ग्रामपंचायत, क्रांतिवीर बर्डे गुरुजी संस्था समूह, वाटेगाव सोसायटी, शाळा, विविध संस्थांमध्ये राजारामबापू, लोकमान्य, टिळक, अण्णा भाऊंच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.येलूर (ता. वाळवा) येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकनेते राजारामबापू पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजन महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याहस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी जे. टी. महाडिक, धनाजीराव पाटील, भगवानराव जाधव, भास्करराव जाधव, विनायकराव महाडिक, भास्करराव पाटील, सरदार गायकवाड, महिपती गायकवाड, दिनकरराव जाधव उपस्थित होते.पेठ (ता. वाळवा) येथे अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन मु. वा. कुलकर्णी, अतुल पाटील, माजी उपसरपंच संदीप पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर पेठकर, माजी पं. स. सदस्य संपतराव बोडरे, तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव पाटील, उपसरपंच डॉ. अरुण पवार, हेमंत पाटील, अशोक पाटील, बी. डी. पाटील, आर. डी. पाटील, तुळशीदास पिसे उपस्थित होते. स्कूलमध्ये अतुल पाटील, सर्जेराव जाधव, ए. व्ही. पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. मु. वा. कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. यावेळी संदीप पाटील, लहू गुरव, अपूर्वा आवळे, डी. एस. पाटील, अशोक माळी, उपस्थित होते. एस. एम. शेख यांनी आभार मानले. आत्मशक्ती शिक्षण संस्थेत हणमंतराव पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले.कामेरीत विविध उपक्रमांनी अभिवादन कामेरी (ता. वाळवा) येथे जनसेवा मंडळाच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. सदस्य सुरेखा जाधव, युवा नेते जयराज पाटील यांच्याहस्ते अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डीपीआयचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, संजय सकटे उपस्थित होते.

Web Title: Democracy can only survive if the political parties survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.