सांगलीत काळ्या खणीत मृत माशांचा खच  - वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:10 AM2018-11-19T11:10:35+5:302018-11-19T11:12:40+5:30

येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रविवारी खणीत हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती.

Demolished black fodder in Sangli, in the vader colony area | सांगलीत काळ्या खणीत मृत माशांचा खच  - वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी

सांगलीत काळ्या खणीत मृत माशांचा खच  - वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी

Next

सांगली : येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रविवारी खणीत हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती. नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून तक्रार केली; पण दिवसभर आरोग्य विभागाचे कर्मचारी काळ्या खणीकडे फिरकले नाहीत. 

काळ्या खणीत मासे मृत झाल्याचे रविवारी सकाळी आढळून आले. सकाळपासूनच वडर कॉलनी, सुंदरनगर परिसरात दुर्गंधी पसरली होती. नेमके मासे कशामुळे मृत झाले, याची चर्चा सुरू होती. काळ्या खणीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आहे. त्यात काहीजण मासेमारीही करतात. अज्ञाताकडून पाण्यात रसायन अथवा गूळ टाकला असावा, त्यामुळे मासे मृत झाल्याचे बोलले जात आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर नागरिकांनी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली.

निंबाळकर यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांना काळ्या खणीच्या स्वच्छतेची सूचना केली. पण रविवारी आरोग्य विभागाकडील कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने दिवसभर कोणीच काळ्या खणीकडे फिरकले नाही. सोमवारी मृत मासे बाहेर काढले जातील, असे आरोग्य अधिकाºयांकडून सांगण्यात आले. 
काळ्या खणीच्या सुशोभिकरणाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तसा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठविला आहे. पण त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव आहे. सत्ताधारी भाजपनेही काळ्या खणीच्या सुशोभिकरणाची ग्वाही दिली आहे. तातडीने सुशोभिकरणाचे काम सुरू झाल्यास काळ्या खणीचे प्रदूषण थांबेल आणि नागरिकांसाठी एक पर्यटनस्थळ निर्माण होईल, असे निंबाळकर म्हणाल्या.

Web Title: Demolished black fodder in Sangli, in the vader colony area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.