Sangli News: मध्यरात्री बांधकाम पाडणे चुकीचे, पालकमंत्र्यांनी चौकशी करून कारवाईचे दिले आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:12 PM2023-01-10T18:12:49+5:302023-01-10T18:13:13+5:30

मिरज : मिरजेत मध्यरात्री बांधकामे पाडण्याचा प्रकार चुकीचा असून, याबाबत प्रशासनाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री सुरेश ...

Demolition at midnight is wrong, The Guardian Minister inquired and ordered action | Sangli News: मध्यरात्री बांधकाम पाडणे चुकीचे, पालकमंत्र्यांनी चौकशी करून कारवाईचे दिले आदेश 

Sangli News: मध्यरात्री बांधकाम पाडणे चुकीचे, पालकमंत्र्यांनी चौकशी करून कारवाईचे दिले आदेश 

googlenewsNext

मिरज : मिरजेत मध्यरात्री बांधकामे पाडण्याचा प्रकार चुकीचा असून, याबाबत प्रशासनाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

मिरजेतील बस स्थानकाजवळ अमर टॉकिजसमोरील दुकाने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह जमावाने जागेच्या वादातून मध्यरात्री पाडल्याने वाद निर्माण झाला आहे. याबाबत पालकमंत्र्यांच्या विरोधातही नागरिकांतून रोष व्यक्त झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्तेचा गैरवापर करून बांधकामे पाडल्याचा आरोप दुकानदार करीत आहेत.

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी याबाबत खुलासा करीत ही घटना चुकीची असून, याबाबत योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. भाजप या गोष्टींचे समर्थन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Demolition at midnight is wrong, The Guardian Minister inquired and ordered action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली