उमेदवारांच्या मानगुटीवर संशयाचे भूत कायम सांगली लोकसभा : संशयकल्लोळ, बंडखोरीचे ग्रहण ठरले डोकेदुखी, रहस्यावरील पडदा निकालादिवशी उठणार

By admin | Published: May 14, 2014 12:12 AM2014-05-14T00:12:07+5:302014-05-14T00:12:26+5:30

सांगली : बंडखोरांनी आणि पडद्यामागील छुप्या कुरघोड्यांनी सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना सर्वाधिक त्रास दिला. या गोष्टींचे लागलेले ग्रहण

Demonstrate the possibility of the candidates being defeated: Sangli Lok Sabha: Suspicion, rebellion took place headache, the screen on mysteries will rise | उमेदवारांच्या मानगुटीवर संशयाचे भूत कायम सांगली लोकसभा : संशयकल्लोळ, बंडखोरीचे ग्रहण ठरले डोकेदुखी, रहस्यावरील पडदा निकालादिवशी उठणार

उमेदवारांच्या मानगुटीवर संशयाचे भूत कायम सांगली लोकसभा : संशयकल्लोळ, बंडखोरीचे ग्रहण ठरले डोकेदुखी, रहस्यावरील पडदा निकालादिवशी उठणार

Next

 सांगली : बंडखोरांनी आणि पडद्यामागील छुप्या कुरघोड्यांनी सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना सर्वाधिक त्रास दिला. या गोष्टींचे लागलेले ग्रहण अजूनही कायम आहे. पडद्यामागील या घटनांचा प्रत्यक्ष मतांवर किती परिणाम झाला असेल, याचा अंदाज अजूनही उमेदवारांना आलेला नाही. निकालादिवशीच आता या रहस्यमयी घटनांवरील पडदा सरकणार असल्याने आगामी काळातील राजकीय समीकरणांवरही याचा परिणाम होईल. शर्यतीत आघाडीवर असलेल्या कॉँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना सुरुवातीपासून बंडखोरीच्या प्रकाराने छळले. याची सुरुवात भाजपमधून झाली. सांगलीचे आ. संभाजी पवार यांनी थेट अधिकृत उमेदवाराच्या चारित्र्यावरच बोट ठेवून पक्षीय नेत्यांची व उमेदवाराची गोची केली. राज्यातील सर्व दिग्गज नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला; मात्र कोणालाही यश आले नाही. त्याचवेळी कॉँग्रेसमध्ये विद्यमान आमदार हाफिज धत्तुरे यांनीही बंडाचा झेंडा फडकाविला. धत्तुरे यांच्या माध्यमातून मुस्लिम मतांची विभागणी होईल, या भीतीपोटी कॉँग्रेसच्या मंडळींनी धत्तुरेंच्या मनधरणीसाठी ताकद पणाला लावली. दोन्ही पक्षांना बंडखोरांनी एकाचवेळी आव्हान दिल्याने राजकीय वातावरण तापले होते. बंडखोरांमागे कोणती शक्ती आहे, याबद्दलही शंका उपस्थित झाल्या. अनेक नेत्यांची, पक्षांची नावे बंडखोरांच्या कृतीला जोडण्यात आली. कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या आघाडी धर्माचा गवगवा जिल्हाभर झाला. मोठ्या नेत्यांनी आपापसातील मतभेद विसरून प्रतीक पाटील यांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठा पणाला लावली; मात्र स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात अजूनही नाराजी कायम होती. जतचे राष्टÑवादीचे नेते विलासराव जगताप यांनी आघाडी धर्माच्या क्षणिक नाटकाला ठामपणे विरोध केला. विधानसभा निवडणुकीवेळी कॉँग्रेसच्या नेतेमंडळींनी दिलेल्या जखमांमुळे जगतापांनी आघाडी धर्मापेक्षा मित्रधर्म श्रेष्ठ मानून भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. पक्षीय आदेश धुडकावला म्हणून जगतापांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. इतक्या मोठ्या घडामोडींमुळे सांगलीचे राजकीय वातावरण जसे तापले होते तसेच ते संशयानेही ग्रासलेही होते. कोणता नेता कोणाचा प्रचार करीत आहे, याविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या. भर सभांमधून संशयकल्लोळ व्यक्त होऊ लागला. हाफिज धत्तुरे यांच्या बंडखोरीची तलवार मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर म्यान झाली. भाजपमधील संभाजी पवारांची बंडखोरी शेवटपर्यंत राहिली. भाजप, कॉँग्रेस उमेदवारांच्या मनी अनेकांबद्दलचे संशय कायम आहेत. संशय खरे ठरणार की खोटे, या प्रश्नाचे उत्तरही १६ मेरोजी मिळेल. (प्रतिनिधी)

Web Title: Demonstrate the possibility of the candidates being defeated: Sangli Lok Sabha: Suspicion, rebellion took place headache, the screen on mysteries will rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.