मिरजेत किसान संघर्ष समितीतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:50 AM2020-12-17T04:50:18+5:302020-12-17T04:50:18+5:30
दिल्लीत सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांचे नसून, दलाल व पाकीटमारांचे असल्याचे उद्गार आमदार सुरेश खाडे यांनी काढले होते. या वक्तव्याचा ...
दिल्लीत सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांचे नसून, दलाल व पाकीटमारांचे असल्याचे उद्गार आमदार सुरेश खाडे यांनी काढले होते. या वक्तव्याचा निषेध करत आमदार खाडे यांनी माफी मागावी व राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार सुरेश खाडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महेश खराडे म्हणाले, कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सरकार मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अन्नदात्याची बदनामी करणाऱ्या भाजपवाल्यांना शेतकरी माफ करणार नाहीत. आमदार खाडे यांच्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा खराडे यांनी दिला. राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब होनमोरे, काँग्रेस नेते अय्याज नायकवडी यांनीही खाडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी उमेश देशमुख, विकास मगदूम, अण्णासाहेब कोरे, प्रमोद इनामदार, संभाजी पाटील, सुजित लकडे, संजय काटे, सुरेश वसगडे, भरत चौगुले, धनराज सातपुते, मुनीर मुल्ला, अमोल पाटील, बाळासाहेब लिम्बीकाई, रावसाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, महेश संकपाळ, के. एस. पाटील, प्रभाकर पाटील, नंदू नलवडे, दऱ्याप्पा पुजारी उपस्थित होते.
फाेटाे : १६ मिरज १
ओळ : मिरज येथील श्रीकांत चाैकात बुधवारी आमदार सुरेश खाडे यांच्या निषेधार्थ किसान संघर्ष समितीने निदर्शने केली.