राष्टवादीतर्फे सांगलीत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:51 PM2019-09-25T18:51:03+5:302019-09-25T19:05:40+5:30

सरकारने शासकीय संस्थांमध्ये हस्तक्षेप करून त्यांचा वापर राजकारणासाठी चालू केला आहे. संपूर्ण महाराष्टत शरद पवार यांच्या सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सरकारने ‘ईडी’च्या माध्यमातून कारवाईचा खेळ सुरू केला आहे.

Demonstrations by NCP | राष्टवादीतर्फे सांगलीत निदर्शने

राष्टवादीतर्फे सांगलीत निदर्शने

Next
ठळक मुद्देशासन दबावापोटी प्रत्येक विरोधी नेत्याला जाणीवपूर्वक टार्गेट करीत आहे.

सांगली : राष्टÑवादीचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सरकारच्या दबावापोटी ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्टÑवादीतर्फे सांगलीत निदर्शने करण्यात आली. शासनाच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

राष्टÑवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की, शासन दबावापोटी प्रत्येक विरोधी नेत्याला जाणीवपूर्वक टार्गेट करीत आहे. सरकारने शासकीय संस्थांमध्ये हस्तक्षेप करून त्यांचा वापर राजकारणासाठी चालू केला आहे.

    संपूर्ण महाराष्टÑात शरद पवार यांच्या सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सरकारने ‘ईडी’च्या माध्यमातून कारवाईचा खेळ सुरू केला आहे. वास्तविक राज्य बँकेचा आणि शरद पवार यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल आम्ही सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत. यापुढे हे प्रकार थांबले नाहीत, तर महाराष्टÑातील राष्टÑवादी कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, मनोज शिंदे-म्हैसाळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा विनया पाठक, ज्योती अदाटे, मुश्ताक रंगरेज, युवराज गायकवाड आदी सहभागी होते.

 

Web Title: Demonstrations by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.