डेंग्यूचे रुग्ण सीडीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:52+5:302021-07-19T04:17:52+5:30
सांगली जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याअखेर डेंग्यूच्यादृष्टीने १०२ नमुने तपासण्यात आले, त्यातून १२ डेंग्यूचे रुग्ण सापडले. सर्व रुग्ण ग्रामीण भागातील ...
सांगली जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याअखेर डेंग्यूच्यादृष्टीने १०२ नमुने तपासण्यात आले, त्यातून १२ डेंग्यूचे रुग्ण सापडले. सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. महापालिका क्षेत्रात एकही रुग्ण नाही. यावर्षी डेंग्यूने एकही मृत्यू झालेला नाही. डेेंग्यू नियंत्रणासाठी गतवर्षी शासनाच्या आर्थिक अनुदानातून ब्रिडींग चेकर्स नियुक्त केले होते. त्यांनी महापालिका क्षेत्रात दीड लाख घरे तपासली. त्याचा फायदा झाला असून, यंदा डेंग्यूचे प्रमाण कमी आहे. यावर्षीदेखील शासनाचे अनुदान मिळताच ब्रिडींग चेकर्स नेमले जाणार आहेत. ग्रामीण भागात वाळवा, कडेगाव, मिरज तालुक्यांत डेंग्यूची घनता जास्त आढळली आहे. सांगलीजवळ हरिपूरमध्येही रुग्ण सापडलेत. डासांची घनता तपासणे, संशयित रुग्णांचे नुमने तपासणे व जनजागृती करणे याद्वारे डेंग्यूला रोखण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सांगलीत २०१९च्या महापुरानंतर डेंग्यूचे रुग्ण वाढले होते, मात्र त्यानंतर गेल्या दोन वर्षांत रुग्णसंख्या घटल्याचे निरीक्षण आहे.