वसंतदादा कारखान्याचे १ कोटी जिल्हा बँकेत जमा

By admin | Published: December 10, 2015 12:04 AM2015-12-10T00:04:19+5:302015-12-10T00:53:46+5:30

गॅरंटी शुल्क : धनादेश वठला; १ कोटी १६ लाख बाकी

Deposit of 1 crore District Bank of Vasantdada factory | वसंतदादा कारखान्याचे १ कोटी जिल्हा बँकेत जमा

वसंतदादा कारखान्याचे १ कोटी जिल्हा बँकेत जमा

Next

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने बँक गॅरंटी शुल्कापोटी मिळालेले २ कोटी १६ लाख रुपयांचे दोन धनादेश जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जमा केले होते. यातील १ कोटीचा धनादेश वठल्याने याप्रकरणी अडकलेल्या आजी-माजी संचालकांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित १ कोटी १६ लाखाचा धनादेश वठण्याची प्रतीक्षा बँकेला आहे. सव्वाचार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात सर्वात कळीचा बनलेला वसंतदादा साखर कारखान्याच्या बँक गॅरंटीचा मुद्दा आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. कारखान्याला परत केलेली रक्कम पुन्हा मिळविण्यात बँक संचालकांना यश आले आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास बगॅसवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारायचा होता. हुडको (हाऊसिंग अ‍ॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन) मार्फत कारखान्याला ३0 कोटी ३२ लाख ८३ हजारांचा कर्जपुरवठा करण्यात येणार होता. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हुडकोला ४३ कोटी ३१ लाख रुपयांची बँक गॅरंटी दिली होती. जिल्हा बँकेनेही याच रकमेत काऊंटर गॅरंटी दिली होती. गॅरंटीपोटी १ टक्का राज्य बँकेस व १ टक्का जिल्हा बँकेस गॅरंटी चार्जेसची रक्कम मिळाली होती. जिल्हा बँकेस एकूण २ कोटी १६ लाख ५५ हजार रुपये मिळाले होते. राज्य बँकेलाही तेवढीच फी मिळाली होती. हुडकोने ३ मार्च २00६ रोजी हा प्रकल्प रद्द केला. त्यानंतर लगेचच कारखान्याने, प्रकल्प रद्द झाल्याने गॅरंटी चार्जेसची रक्कम परत करण्याविषयीचे पत्र जिल्हा तसेच राज्य बँकेला पाठविले. राज्य बँकेने गॅरंटी फीची रक्कम जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा केली. त्यानंतर कारखान्याने जिल्हा बँकेकडेसुद्धा फी परत करण्याची मागणी केली. वकील पॅनेलने दिलेला सल्ला विचारात न घेता, संचालक मंडळाने ही रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम कारखान्याला देण्यात आली. जिल्हा बँकेच्या ४ कोटी १८ लाख १६ हजार रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात हाच मुद्दा कळीचा बनला आहे. पूर्ण रक्कम भरल्यानंतर आता हा मुद्दा गैरव्यवहार प्रकरणातून वगळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळेल. (प्रतिनिधी)

Web Title: Deposit of 1 crore District Bank of Vasantdada factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.