मुलाचे ऊसबिल वडिलांच्या कर्जात जमा!

By admin | Published: June 17, 2017 12:12 AM2017-06-17T00:12:09+5:302017-06-17T00:12:09+5:30

मुलाचे ऊसबिल वडिलांच्या कर्जात जमा!

Deposit of child's mustache father! | मुलाचे ऊसबिल वडिलांच्या कर्जात जमा!

मुलाचे ऊसबिल वडिलांच्या कर्जात जमा!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर लाखो शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला; पण कर्जमाफी जाहीर होताच सोसायटी व बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैशाची कपात करीत कर्जाची रक्कम भरून घेण्यास सुरुवात केली आहे. यापेक्षाही एक अफलातून प्रकार कऱ्हाड तालुक्यातील नडशी गावात घडला असून, घाईगडबडीत कर्जाची रक्कम भरून घेताना सोसायटीने वडिलांचे कर्ज मुलाच्या ऊसबिलातून वर्ग करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी राज्यभर संपाचे हत्यार उपसल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ११ जून रोजी राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आजपासूनच कर्ज माफ झाल्याची घोषणा केली. तसेच या अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज तातडीने देण्यात यावे, असेही जाहीर केले. मात्र, शासनाच्या या घोषणांकडे दुर्लक्ष करीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व नडशी विकास सेवा सोसायटीने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. या कार्यक्षेत्रातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलाचा दुसरा हप्ता काही दिवसापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. हे पैसे आता शेतकऱ्यांच्या हातात मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नडशी येथील विकास सेवा सोसायटीने १२ जून रोजी अनेक शेतकऱ्यांच्या नावावर जमा झालेल्या ऊस बिलाच्या रकमेतून सोसायटीचे कर्ज परस्पर जमा करून त्यांना त्याच्या पावत्या दिल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शासन एका बाजूला कर्जमाफीची घोषणा करीत असताना जिल्हा मध्यवर्ती बँक व सोसायटी अशाप्रकारे कर्ज भरून कशी घेऊ शकते, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
यापेक्षाही भयानक प्रकार म्हणजे नडशी येथील मारुती शामराव थोरात यांचे सोसायटीचे ८६ हजार रुपये कर्ज आहे. मात्र, त्यांचा मुलगा अमोल मारुती थोरात याच्या नावावर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे २० हजार ४९० हे ऊसबिल जमा झाले होते. ते ऊसबिल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतनगर शाखेमधून वडिलांच्या सोसायटी कर्ज खात्यात परस्पर जमा करण्यात आल्याचा धक्कादायक कारभार करण्यात आला असून, मारुती थोरात यांना विकास सोसायटीने याबाबतची पावती दिली आहे. मुलगा व वडील या दोघांचीही संमती नसताना अशाप्रकारे बँकेमधून हे पैसे सोसायटीच्या दुसऱ्याच कर्ज खात्यावर कसे वर्ग करण्यात आले, असा सवाल उपस्थित होत जात आहे.
कर्जमाफी ?.. छे छे, उलट कर्ज वसुली !
११ जून रोजी शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर १२ जून रोजी परस्पर ऊसबिलाची रक्कम सोसायटीच्या कर्ज खात्यावर जमा करून घेतल्याने या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण
झाला आहे. बँक व सोसायटीच्या या कारभारामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Web Title: Deposit of child's mustache father!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.