‘वंचित’चे महागाईविरोधात निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:41+5:302021-06-22T04:18:41+5:30
आटपाडी : महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत, ...
आटपाडी : महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीकडून करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदार सचिन मुळीक यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, कोविडने संपूर्ण जगाला विळखा घातला असून, या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. कष्टकरी, हातावरचे पोट असणारे व रोजंदारी करणाऱ्या जनतेचे गेले सव्वा वर्ष अतोनात हाल झाले आहेत. त्यात बऱ्याच कंपन्या बंद झाल्या तर काही कंपन्यांमध्ये कामगार कमी करण्यात आले. त्यातच गगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे जनता हवालदिल झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तू महाग केल्या आहेत. सर्व जीवनावश्यक वस्तू स्वस्त कराव्यात व जनतेला दिलासा द्यावा अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी साहेबराव चंदनशिवे, शैलेंद्र आईवळे, नवनाथ जावीर, अखिल भोसले, भिकाजी खरात, रोहन भिसे, नवनाथ सावंत, निवृत्ती खंदारे, आदी उपस्थित होते.