शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकच्या गाड्या फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 12:19 PM2021-12-18T12:19:35+5:302021-12-18T12:22:21+5:30

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत.

Desecration of a statue of Lord Shiva in Bangalore In Miraj angry Shiv Sainiks blew up vehicles in Karnataka | शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकच्या गाड्या फोडल्या

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकच्या गाड्या फोडल्या

Next

मिरज : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर साई फेकल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत.

आज, सकाळी मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी बस स्थानक परिसरात एकत्र येऊन कर्नाटक गाड्या जाणाऱ्या फोडल्या. या परिसरात असलेल्या हॉस्पिटल वरील कर्नाटक अक्षारतील बोर्ड ही शिवसैनिकांनी दगड मारून फाडले.

याप्रकरणी मिरज गांधी चौकी पोलिसांनी चंद्रकांत मैगुरे, विजय शिंदे, महादेव हूलवान, अतुल रसाळ, पप्पू शिंदे, गजानन मोरे, दिलीप नाईक, प्रकाश जाधव, किरण कांबळे, यांना घटनास्थळवरून ताब्यात घेतले. कर्नाटकमधून आलेल्या तीन गाड्या शिवसैनिकांनी फोडल्या. त्यापैकी दोन गाड्या गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या.

Web Title: Desecration of a statue of Lord Shiva in Bangalore In Miraj angry Shiv Sainiks blew up vehicles in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.